नगर: दौंड – अहमदनगर रस्त्यावर काष्टी येथील शिवनेरी हॉटेलसमोर दोन चारचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात श्रीगोंदा येथील बांधकाम व्यावसायिक जय मरकड यांचा मृत्यू झाला तर स्कॉर्पिओ गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागेश होलम यांनी सांगितली.
एमएच १६ बीएच ४७१० आणि एमएच ४२ के ८६२२ या दोन चारचाकी वाहनांचा समोरासमोर धडकून अपघात झाला. मांडवगणकडून येणाऱ्या बाह्यवळण रस्त्याने व्यावसायिक जय मरकड हे दौंड – नगर महामार्गाला आले असता त्यांना नगरकडून दौंडच्या दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओची जोराची धडक बसली.

त्यामध्ये मरकड यांचा जागीच मृत्यू झाला . याठिकाणी हॉटेल, दवाखाना, महाविद्यालय असून वळणरस्ता आहे. त्यामुळे येथे अपघात होत आहेत . याठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मरकड यांचे सहाच महिन्यांपूर्वी लग्न झाल्याचे समजते. तरुण व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
- रेल्वेसाठी मोठा पॅकेज, वंदे भारत स्लीपर ट्रेनसह अमृत भारत रेल्वेचा विस्तार
- विजय सेल्समध्ये iPhone 16 आता अर्ध्या किमतीत-Limited Offer, एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध
- साध्या लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर; तिकीट दर किती? आराखड्यासाठी आयआयटीची नियुक्ती
- गजकेसरी, धन आणि रवि योगांचा प्रभाव; वृषभ ते मीन राशींसाठी भाग्यवर्धक दिवस
- बँक खाते आणि क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर असतील तर कर्ज अडकेल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य













