अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- नगर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घ्यावीे. सर्वांना मिळून ही कोरोनाची साखळी तोडायची आहे.
त्यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे तंतोतंत पालन करत घरातच बसावे. कोरोना बाधित रुग्णांनी टेस्ट केल्या पासूनच विलीगीकरण कक्षात सामील व्हावे, जेणेकरून आपला परिवार सुरक्षित राहील.
ज्यांना अत्यल्प लक्षणे आहेत त्यांनी हॉस्पिटलमध्ये न जाता कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे. असे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. ना.तनपुरे यांनी बुऱ्हाणनगर येथील कोविड सेंटरची पाहणी केली.
यावेळी येथील रुग्णांशी संवाद साधून मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत विचारपूस केली. तसेच तहसीलदार व वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही महत्वाच्या सूचना केल्या.
यावेळी ॲड.अभिषेक भगत, सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव, तहसीलदार उमेश पाटील व आरोग्य अधिकारी मांडगे, नंदकुमार गागरे, ग्रामसेवक दळवी आदी उपस्थित होते. यावेळी गावात करोनामुळे मृत्यू झालेल्या
शहाराम चेमटे, सुरेश हिरणवाळे व शिवाजी भगत आदींच्या कुटुंबियांचे सांत्वन मंत्री तनपुरे यांनी केले. ॲड.अभिषेक भगत म्हणाले, बुऱ्हाणनगर गावात व परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
याठिकाणी कोविड सेंटर सुरु झाल्याने नागरिकांची चांगली सोय झाली आहे. अमोल जाधव यांनी आभार मानताना सांगितले, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नगर तालुक्यावर कायम लक्ष असते.
तालुक्याचे महत्वाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. नगर तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. असे म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|