अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज रविवारी जाहीर होत आहे. या निवडणुकीत ममतांच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे.
पश्चिम बंगालमधील सर्व २९२ जागांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यानुसार तृणमूल काँग्रेस मोठी आघाडी घेण्याची शक्यता असून स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.
तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपचं ‘अब की बार 200’ स्वप्नं हवेत विरणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
सर्व जागांचे कल हाती आले असून तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान यानंतर ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर हालचाली सुरु झाल्या आहेत.
ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेर मोठा तंबू उभारण्यात आला असून मोठे स्क्रीनही लावण्यात आले आहेत.
तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कोणत्याही राज्यात सत्तापरिवर्तन होणार नाही असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता बनवणार असा विश्वास संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
चर्चा काहीही होऊ द्या ममताच जिंकणार असून त्यांचा पराभव करणं शक्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|