अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- ब्राह्मणी येथील १०२ वर्षीय आजीबाई सखुबाई गंगाधर हापसे यांनी कोरोनावर मात केली.जिल्ह्यासह देशभर कोरोनाचा सर्वत्र कहर सुरू आहे.
व्यवस्था कोलमडली.प्रशासन अन् आरोग्य विभाग हतबल झाले. गावोगावी मृत्यू तांडव सुरू आहे. अशा परिस्थितीत १०२ वर्षीय आजीबाईंनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली.
आनंदाची बातमी ब्राह्मणीकरांसह जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे.आजीबाई सखुबाई गंगाधर हापसे यांचा चाचणी रिपोर्ट १९ दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
दरम्यान सर्व नियम पाळून. आजीबाईंनी विद्यापीठ कोविड सेंटर मध्ये क्कोरनटाईन होण्याचा निर्णय घेतला.
अन् सात दिवसानंतर पुन्हा घरी परतल्यावर आज अखेरपर्यंत त्या (स्वतंत्र) विलीगिकरणात आहेत. अशी माहिती त्यांचे नातू एकनाथ भाऊसाहेब हापसे यांनी दिली.
भाऊसाहेब, मच्छिंद्र व दत्तात्रय गंगाधर हापसे यांच्या त्या आई आहेत. आजीबाई बरोबर एक मुलगा व सून पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. त्यांनीदेखील आजीबाई सोबत कोरोनावर हरवत मात केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|