मुंबई :- गेल्या अठरा दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेला अखेर आज सांयकाळी पूर्णविराम भेटला आहे. राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला असून राष्ट्रवादी व काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देण्यात आले आहे. फॅक्सव्दारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे २० वर्षानंतर महाराष्ट्रात आता शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे.

शिवसेनेतून मुख्यमंत्रिपदासाठी काही नावं पुढे येतायत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. तर उप मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.अजित पवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवून राज्यात पर्यायी सरकार दिले आहे. उद्या मंगळवारी शपथविधी सुद्धा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवून राज्यात पर्यायी सरकार दिले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.
- सापांची भीती वाटते ? मग घरात ही वस्तू अवश्य ठेवा, साप दिसला की शिंपडा, 100% साप पळून जाणार
- लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी ! तुम्हालाही योजनेतून काढून टाकलंय का ? कशी पाहणार यादी ?
- पावसाळा संपल्याबरोबर 10 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय ! पहिल्या दिवसापासून कमाई सुरु
- लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार ! 12,500 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळणार 40,00,000 रुपये, पोस्टाच्या ‘या’ योजनेत आजच गुंतवणूक करा
- Post Office च्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा ! दर महिन्याला मिळणार फिक्स व्याज