अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- कर्जत तालुक्यात हिंगणगावच्या शिवारात ट्रॅक्टरने वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टरवर कारवाई केली.
पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अमोल गोसावी व अनोळखी इसम सरकारी कामात अडथळा करून ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले.
त्यास कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. कर्जत पोलिसांनी या प्रकरणी अमोल बापूराव गोसावी, (वय ३२ वर्ष, रा. हिंगणगाव, ता.कर्जत) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|