‘म्हणून प्रशासनाने ‘ती’ अट शिथिल करावी’!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- राज्य सरकारने शैक्षणिक वर्षाची उन्हाळी सुट्टी जाहीर केली असताना विद्यार्थी-पालक, शिक्षक यांना राज्यातील जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी ई पासची अट शिथिल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना हे संक्रमण रोखण्यासाठी टाळेबंदी सुरु आहे. सरकारने जिल्हा बंदीचा निर्णय घेतला असून, दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची तरतुद केली आहे. उन्हाळी सुट्टी निमित्ताने शिक्षक व विद्यार्थी स्वगृही जात असतात.

परंतु दि.१५ मे पर्यंत कडक लॉकडाउन आहे. यामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे. सदर प्रक्रिया विद्यार्थी-पालक, शिक्षक यांना अतिशय क्लिष्ट आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शिक्षकांच्या स्थलांतरामुळे यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येवू शकतो किंवा ताण पडू शकत असल्याचे म्हंटले आहे.

उन्हाळी सुट्टीसाठी विद्यार्थी-पालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना स्वगृही किंवा मूळ गावी जाण्यासाठी ई पासची अट काही काळापुरती शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, राज्य कोषाध्यक्ष किरण भावठाणकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी,

शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य कार्यालय मंत्री सुनील पंडित, राज्य संयोजक रात्र शाळा विभाग निरंजन गिरी आदिंसह सर्व जिल्हाध्यक्ष, कार्यवाह व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe