अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोना रुग्णांनी नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करावा प्रत्येकाने आपल्या कुटुंबाबरोबर समाजाची काळजी करावी.
या कोरोनाच्या लढाईमध्ये सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे तेव्हाच आपण कोरोनाला हरवू शकतो. कोरोना रुग्णांना चांगल्या आहाराची गरज असून, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नगर तालुक्यातील विविध कोविड सेंटरला सुमारे १० हजार अंडी वाटप केली आहे.
कोरोना संकट काळामध्ये आम्ही जनतेबरोबर असून, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करत आहोत. नगर जिल्ह्यावर आलेले कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
कोरोनाची साखळी तोडण्याची खरी गरज असून प्रत्येकाने सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भाजपचे युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केले. माजी मंत्रीकर्डिले
यांच्यावतीने नगर तालुक्यातील विविध कोवीड सेंटरमध्ये मधील कोरोना रुग्णांना सुमारे दहा हजार अंड्यांचे वाटप भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांच्या हस्ते केले.
माजी मंत्री कर्डिले यांच्यावतीने आरणगाव कोविड सेंटर मधील कोरोना रुग्णांना फूड प्रोटीन मिळावे, या हेतूने प्रत्येक रुग्णांना पाच दिवस पुरतील असे अंडे देण्यात आले.
नगर तालुक्यावर जेव्हा-जेव्हा संकट येते तेव्हा माजी मंत्री कर्डिले धावून येत असतात, जनतेबरोबर राहून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम ते करीत असतात. कोरोना संकट काळामध्ये गेली एक वर्ष शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|