मी एकटाच काही करू शकत नाही, लवकरच भारतात परतणार – अदर पूनावाला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना लसीकरणासाठी वाढलेली लसींची मागणी पूर्ण करण्यासाठी लस उत्पादनासंबंधी दबाव येत असल्याचे सीरम इ्स्टिटट्यूटचे सीइओ अदर पूनावाला यांनी नुकतेच सांगितले.

त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांत लंडनहून भारतात परतण्याची घोषणा पूनावाला यांनी केली आहे. पूनावाला यांनी ट्विटद्वारे माहिती दिली की, ब्रिटनने सर्व भागीदार आणि भागधारकांसह बैठकीचे आयोजन केले होेते.

दरम्यान, पुण्यात कोविशिल्डचे उत्पादन पूर्णक्षमतेने सुरू असल्याचे सांगताना मला आनंद झाला. मी काही दिवसांत परतल्यावर या कामाचा आढावा घेण्यास उत्सुक आहे. पूनावाला यांना सरकारी संरक्षण दिल्यानंतर

त्यांनी लंडनमध्ये एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्याची मागणी करण्यासाठी भारतातील काही बलाढ्य लोक फोनवर संतापजनक बोलले आहेत.

सीआयआय भारतात ऑक्सफोर्ड/अस्ट्राजेनिकाकडून कोविड १९ प्रतिबंधित कोविशिल्ड लसीचे उत्पादन करत आहे. भारतात लसीसंदर्भात वाढता दबाव पाहून मी, पत्नी आणि मुलांसोबत लंडनमध्ये आलो आहे.

भारतीय सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संभाव्य धोके लक्षात घेता पूनावाला यांना संरक्षण देण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान देशात कोठेही त्यांच्या संरक्षणासाठी असतील.

यात चार-पाच कमांडो असतील. मी नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ लंडनमध्ये राहत आहे. सर्व काही माझ्या खांद्यावर पडले आहे. परंतु मी एकटाच काही करू शकत नाही. मी अशा परिस्थितीत राहू शकत नाही.

आम्ही फक्त आमचे काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मला माहीत आहे की, आपण प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. आपण त्याबदल्यात ‘ते’ काय करतील, याचा अंदाज घेऊ शकत नाहीत, अशी भीती पूनावाला यांनी व्यक्त केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe