अहमदनगर शहरात ‘या’ तारखेपर्यंत फळ व भाजीपाला बंद !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, वाढत चाललेले संक्रमण रोखण्यासाठी अहमदनगर भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनन १५ मे पर्यंत फळ व भाजीपाला विभाग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,

अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते व सचिव मोहन गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मनपातर्फे १० मेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये १५ मे पर्यंत सकाळी चार ते सात पर्यंत फळे व भाजीपाला व्यावसायिक दुकाने उपबाजार नेप्ती येथे सुरू ठेवण्याचे आदेश आहेत.

आमदार संग्राम जगताप व महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्या कडक लॉकडाऊनच्या निर्णयाचे असोसिएशनच्यावतीने स्वागत करुन पाठिंबा देण्यात आला आहे.

तर कोठी मार्केटयार्ड येथील फळे व भाजीपाला विभाग १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News