शहरातील ‘या’ रुग्णालयांना मिळाल्या ऑक्सीजन निर्मिती मशीनसह व्हेंटिलेटर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यामुळे ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरचा सातत्याने तुटवडा भासतो आहे.

यातच दानशुर व्यक्तींकडून जिल्हा रुग्णालय व बूथ हॉस्पिटलला 10 ऑक्सीजन तयार करणाऱ्या मशीन व 4 व्हेंटिलेटर मशीन देण्यात आल्या आहेत.

देशासह जिल्ह्यावर आलेले कोरोनाचे संकट भयानक आहे, जिल्ह्यात कोरोनाचे अतिदक्ष रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची खरी गरज पडत आहे.

मृत्यू दर कमी करण्यासाठी समाजातील मुलतानचंद बोरा अहमदनगर ट्रस्ट यांनी गरजू कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे पाच ऑक्सिजन तयार करण्याची मशीन व दोन व्हेंटिलेटर मशीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा याच्या कडे सुपूर्त केले.

तसेच शहरातील गेल्या एक वर्षापासून कोरोना संकटकाळात बूथ हॉस्पिटलने कोरोना रुग्णांवर मानवसेवेतून उपचार करून सर्व रुग्ण बरे केले.

त्यांच्या या कामाला फिरोदिया ट्रस्ट पुणे यांनी दोन व्हेंटिलेटर मशीन व पाच ऑक्सिजन तयार करणाऱ्या मशीन बूथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे सुपूर्त केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News