अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, जनादेश महायुतीला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांनी सत्ता स्थापन करायला हवी होती. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री व कमी जागा असेल त्यांचा उपमुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते, पण हा निर्णय शेवटी वरिष्ठांचा असतो.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांना एकरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
- आता फक्त 35 हजारात मिळणार नवा कोरा ट्रॅक्टर ! सरकार करणार मदत
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांचे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले जाणार, कारण काय ?
- महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा नवा जीआर ! आता ‘हे’ एक काम केल्याशिवाय 1500 रुपये मिळणार नाही
- पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षा शुल्कात झाली मोठी वाढ