जीवघेण्या हल्ल्यानंतरही आरोपीवर कारवाई नाही,पाचपुतेंची तक्रार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील हॉटेलमध्ये मी झोपलेलो असताना अज्ञात व्यक्तीने खुनी हल्ला केला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ला होतानाचे चित्रीकरण पोलिसांना दिले आहे,

पण गुन्हा घडून २२ दिवस झाले, तरी कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही. या घटनेुळे आमचे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले असून चौकशी करण्यास गेल्यास पोलिस उडवाउडवीची उत्तरे देतात, अशी तक्रार सुनील पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत केली.

पाचपुते म्हणाले, २१ ऑक्टोबरला टाकळी काझी येथील माझ्या मालकीच्या हॉटेल विजयमध्ये मी झोपलो असताना रात्री ११ च्या सुमारास माझ्यावर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. माकडटोपी घातलेल्या तोंडाला रूमाल बांधून आलेल्या व्यक्तीने दगडाने वार केले. मी कसाबसा तेथून पळालो. तातडीने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले. माझ्या डोक्याला १४ टाके पडले आहेत. घटनेला २३ दिवस झाले, परंतु पोलिस तपास करत नाहीत. चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यांनी तातडीने आरोपीला पकडावे, अशी मागणी पाचपुते यांनी केली. या वेळी प्रकाश पाचपुते, बापूराव पाचपुते, विजय पाचपुते आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment