त्या तरुणाची दोन दिवसांनंतरही ओळख पटली नाही

Ahmednagarlive24
Published:

राहुरी :- मुळा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाची ओळख दोन दिवसांनंतरही पटू शकलेली नाही. हा तरुण शनिवारी दुपारी मुळा धरणाच्या प्रवेशद्वाराशेजारच्या दत्त मंदिराजवळ थांबला होता.

रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह उजवा कालव्याच्या पंपहाऊसलगत पाण्यावर तरंगताना आढळला. गावकऱ्यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. ओळख पटवण्यासाठी मृतदेह राहुरी येथील शवविच्छेदन केंद्रात ठेवण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रवीण खंडागळे यांनी सोशल मीडियावर मृत तरुणाचे छायाचित्र, तसेच वर्णन टाकून ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. ५ फूट ५ इंच उंच असलेल्या या तरुणाच्या अंगात काळा टी शर्ट व निळ्या रंगाची जीन पँट आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment