नागपूर ;- घरगुती वादातून पतीने पत्नीला रस्त्यावर गाठत तिच्यावर धारदार शस्त्रांचे घाव घालत तिला गंभीररीत्या जखमी केल्याची थरारक घटना सोमवारी दुपारी नागपुरातील कॅनल रोड या रहदारीच्या मार्गावर घडली.
या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शींमध्ये घबराट पसरून पळापळ झाली. मोनाली सचिन तोटे असे या जखमी महिलेचे नाव असून तिला धंतोली परिसरातील केअर रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले आहे. तिची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही थरारक घटना घडली. मोनाली तोटे या नेहमीप्रमाणे स्कुटी घेऊन कामावर निघाल्या होत्या. त्याच वेळी त्यांचा पती सचिन याने त्यांचा स्वत:च्या वाहनाने पाठलाग सुरू केला.
सीताबर्डी परिसरात कॅनल रोडवर सचिनने त्यांच्या वाहनापुढे आपले वाहन आणून त्यांना खाली पाडले. यानंतर दोघांमध्ये मिनिटभर वादही झाले. या वादात सचिनने स्वत:जवळील धारदार शस्त्र काढून मोनाली यांच्यावर वार केले.
- आठवा वेतन आयोग…… ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचे बेसिक पे 18,000 रुपयांवरून थेट 44,000 रुपयांवर पोहचणार!
- मोठी बातमी ! एका वर्षात पाचपट परतावा देणाऱ्या कंपनीची बोनस शेअर्सची घोषणा, रेकॉर्ड डेट नोट करा
- महाराष्ट्रातील ‘या’ चार जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग ! 37013 कोटी रुपयांचा निधी मंजूर, कसा असणार रूट?
- गव्हाच्या ‘या’ 4 जातीच्या लागवडीतून मिळणार विक्रमी उत्पादन ! कमी खर्चात मिळणार 50 क्विंटल पर्यंत उत्पादन
- शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन 100% मालामाल बनवणार ! ‘या’ 5 मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, पिवळ्या सोन्याचे लेटेस्ट रेट चेक करा….