अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- तब्बल पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे बंद असलेले लासलगाव बाजार समितीत कांदा आणि धान्य लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. लिलाव सुरू झाल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सध्या एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
१५ दिवसानंतर सुरू झालेल्या बाजारसमितीत आज कांद्याला १५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने निफाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे.
यामुळे लासलगाव व परिसरातील गावात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. यात व्यापारी , हमाल-मापारी व कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक बाधित होत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लासलगावसह ४२ गावातील नागरिकांनी दि.१९ एप्रिल रोजीपासून जनता कर्फ्यूची घोषणा केली होती.
त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समितीतील कांदा आणि धान्य लिलाव बंद होते. सोमवारपासून पुन्हा कांदा आणि धान्य लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत.
अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे कांद्याला १५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|