वनविभागाच्या डोंगरात आढळला महिलेचा मृतदेह,परिसरात खळबळ !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-  पाथर्डी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय येथील धायतडकवाडी येथील एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह वन विभागाच्या डोंगरात आढळून आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सोमवारी सकाळी अकोले-करोडी रोडवरील जगदंबा वस्ती येथे एक महिलेचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली.

या महिलेची ओळख पटली असून द्रौपताबाई निवृत्ती धायताडक (वय ७०) अशी तिचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार महिलेच्या बाजूला असलेल्या औषधांच्या बाटल्या आढळून आल्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe