अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पुलात बाधीत होणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांना २५ नोव्हेंबरपर्यंत हमीपत्र भरून देण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून दिल्यामुळे मालमत्ताधारकांना सुमारे २५ टक्के आर्थिक नुकसान टाळता येणार आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी सोमवारी दिली.
उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रियेतील मालमत्ताधारकांची बैठक खासदार विखे यांनी बोलावली होती. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता दिवाण आदी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, मालमत्ताधारकांशी चर्चा झाली आहे. शासनाने अधिग्रहण केले, तर मालमत्ताधारकांचे २५ टक्के आर्थिक नुकसान होणार होते. मालमत्ताधरकांनी जर हमीपत्र भरून दिले, तर हे नुकसान टाळता येणार आहे. त्यामुळे मी चर्चा केली.
उड्डाणपुलाच्या संपादनात सुमारे २१ जणांची ४ हजार ६५५ चौरस मीटर जागा बाधित होणार आहे. शासकीय जागा २८८८ चौरस मीटर आहे. याव्यतिरिक्त लष्कराच्या हद्दीतील सुमारे ६७०० चौरस मीटर जागाही संपादित करावी लागणार आहे. तातडीने पुलाचे काम सुरू करण्यासाठी बायपासचेही मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
मी का वाईट होऊ ?
नगरचे राजकारण कळत नाही, असे मी म्हणायचो, पण विधानसभेनंतर मला कळले आहे की येथे सगळेच आतून गोड आहेत. त्यामुळे मी तरी कशाला वाईटपणा घेऊ, असे वक्तव्य करत अंतर्गत विरोधकांनाही डॉ. सुजय विखे यांनी टोला लगावला.
- रेल्वेसाठी मोठा पॅकेज, वंदे भारत स्लीपर ट्रेनसह अमृत भारत रेल्वेचा विस्तार
- विजय सेल्समध्ये iPhone 16 आता अर्ध्या किमतीत-Limited Offer, एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध
- साध्या लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर; तिकीट दर किती? आराखड्यासाठी आयआयटीची नियुक्ती
- गजकेसरी, धन आणि रवि योगांचा प्रभाव; वृषभ ते मीन राशींसाठी भाग्यवर्धक दिवस
- बँक खाते आणि क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर असतील तर कर्ज अडकेल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य













