अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- सध्याच्या परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार ही एक चांगली उपचार पद्धती आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन प्रमाणे प्लाझ्माचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.
यासाठी प्लाझ्मा दानाबाबत जनजागृती अत्यावश्यक आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्या बंधू भगिनींचे प्राण वाचवण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांनी न घाबरता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अॅड. अभिषेक भगत यांनी सुरु केलेल्या प्लाझ्मा दान मोहिमेच्या जनजागृतीसाठी पुढाकर घेतला आहे. त्या अनुषंगाने नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांची त्यांनी भेट घेवून प्लाझ्मा दान मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
मंत्री तनपुरे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी अॅड. भगत यांच्या समवेत नगर शहरातील जनकल्याण रक्तपेढीला भेट देवून प्लाझा संकलनाची माहिती घेतली. जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठ्ये यांनी त्यांना माहिती दिली.
यावेळी, अमोल जाधव, डॉ. गुलशन गुप्ता, सुशांत पारनेरकर उपस्थित होते. मंत्री प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले, येणाऱ्या काळात कोरोनाचा अजून प्रादुर्भाव वाढण्यची शक्यता आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान मोहिम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या मोहिमेत सहभागी होत आहे.
जिल्हा आरोग्यधिकारी व महानगरपालिका डूनही कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीची माहिती घेवून त्यांना वैयक्तिक संपर्क साधून प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करणार आहे. अॅड. भगत यांनी प्लाझ्मा दान मोहीम सुरु करून अत्यावश्यक उपक्रम हाती घेतला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|