रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी केले गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराकडून रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात जास्त दराने विक्री करणारे तीन आरोपी ,वाहन आणि तीन रेमडेसिवीर इंजेक्शन असे एकूण ७ लाख ३२ हजार ८५० रुपये किमतीचे मुद्देमालासह आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी हेमंत दत्तत्राय कोहक (रा.बोल्हेगाव), भागवत मधुकर बुधवंत (रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव) आणि आदित्य बाबासाहेब म्हस्के (रा. माताजीनगर, एमआयडीसी) या तिघांना अटक केली आहे.

यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पो.स्टे. करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,

पोलिसांना गुप्त माहिती समजली कि शहरातील काही खासगी हॉस्पिटलबाहेर काहीजण रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत आहे. पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe