मान्सूनपूर्वच राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने राज्यात आगामी काही दिवसात पावसासह गारपिटीची शक्यात निर्माण झाली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात विविध ठिकाणी गारपीटीसह जोरदार पाऊस झाला आहे. तसेच राज्यात शुक्रवारपर्यंत मेघगर्जनेसह गारपीटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोमवारी तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा घसरला असून, राज्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
कर्नाटक राज्यात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय राज्यात शुक्रवारपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत पाऊस झाला. तर विदर्भासह गोवा, कोकण या ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे.
आता पुढील आठवडाभर पुण्यात अवकाळी पावसाचे ढग असणार आहे. पण 7 मे पर्यंत राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|