धक्कादायक ! वडिलांच्या जळत्या चितेवर मुलीने मारली उडी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-देशभरात कोरोनाने हाहाकार केला आहे. यामुळे दरदिवशी अनेकांचा बळी यामध्ये जातो आहे. यातच जवळच्या व्यक्तींचे निधन झाले कि त्यांचा विरह अनेकांना सहन होत नाही.

असाच एक प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे. जयपूरमध्ये कोरोनामुळे दामोदरदास शारदा नावाच्या 73 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

वडिलांच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने वडिलांच्या पेटत्या चितेवर उडी घेत त्यांच्या मुलीने जीव देण्याचा प्रयत्न केला. हि धक्कादायक घटना राजस्थानच्या बाडमेरमध्ये घडली.

या घटनेत ही महिला 70टक्के भाजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाडमेर येथे राहणाऱ्या दामोदरदास यांना कोरोनाची लागण झाली होती.

त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. यावेळी त्यांची मुलगी सोबत आली.

वडिलांना अग्नी दिल्यानंतर मुलींचे जळत्या चितेवर उडी घेतली. तिथे उपस्थित लोकांनी तिला ओढून बाहेर काढलं. मात्र, तोपर्यंत ती 70 टक्के भाजली गेली होती.

त्या जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून तिला पुढील उपचारासाठी जोधपूरला पाठवण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe