अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-कोरोनाबाबत सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी अर्थिक मदतीचा धनादेश मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बुधवारी सुपुर्द केला.
दरम्यान राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु असून या कठीण प्रसंगी सर्वांनी एकत्रित येऊन या महामारीपासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाला मदत करण्याची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कोरोनाच्या या महामारीपासून वाचण्यासाठी आणि या विषाणूशी लढण्यासाठी राज्याला आर्थिक चणचण भासत आहे.
हीच सामाजिक बांधिलकी जपत अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रुपये एक कोटीची मदत करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला.
कोरोनाच्या संकट काळातही बँकेने मदत करण्याचा निर्णय घेतला असून, एक कोटींची मदत करण्यात आली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|