अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग झाला आहे. त्याअनुषंगाने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरात सर्व लोकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
दरम्यान या मोहिमेअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात गावपातळीवर बाधितांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात 24 हजार 372 करोना संशयित रुग्ण सापडले आहेत.

यातील 8 हजार 700 जणांची चाचणी केली असून त्यापैकी 2 हजार 769 करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. दरम्यान केवळ सर्वेक्षणात एवढ्या बाधितांची भर पडली आहे.
तर अद्याप 15 हजार 675 संशयितांची चाचणी होणे बाकी आहे. यातही अनेक जण बाधित आढळण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव किती वेगाने पसरतो आहे याची कल्पना येऊ लागली आहे.
24 हजाराहून अधिक संशयित :- आरोग्य पथकाने जिल्ह्यातील 7 लाख 80 हजार घरांमध्ये भेट देऊन सुमारे 38 लाख (90 टक्के) लोकांची तपासणी केली.
त्यामध्ये 98 पेक्षा जास्त ताप असणारे, 95 पेक्षा कमी ऑक्सिजन पातळी असलेले, 100 पेक्षा जास्त पल्स रेट असलेले, अंगदुखी, वास न येणे, चव न लागणे, जुलाब होणे, याशिवाय सर्दी,
ताप, खोकला तसेच तीव्र श्वसन दाह अशी लक्षणे असलेली एकूण 24 हजार 372 संशयित लोक आढळले. या सर्वांना पथकाने जवळच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|