पत्रकाराला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोनई पोलीस निरीक्षकांना पत्रकारांचे निवेदन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-  सध्या सर्वत्र कोरोनाची अतिशय बिकट परिस्थिती असून देखील आपल्या जीवाची व कुटुंबियांची पर्वा न करता समाजास माहितीचे आदानप्रदान व्हावे यासाठी पत्रकार  काम करत असतात

हे काम करत असताना नेहमी पत्रकार बंधू व भगिनींना समाजविघातक प्रवृत्तीचा सामना करावा लागतो असाच प्रकार केडगाव येथे नुकताच झाला भांडणे मिटवण्यासाठी पत्रकाराचे बंधू केडगाव

येथे थांबले असता याचा राग धरून पत्रकार मुरलीधर तांबडे त्यांचे वृद्ध आई वडील यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी घरात घुसून धक्काबुक्की करून खाली पाडले व जीवे मारण्याची धमकी दिवसा ढवळ्या दिली

सदर गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन अनगर येथे दाखल झालेला असून तरी सुद्धा गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांचेवर अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आली

नाही सदर गुन्हेगारांपासून पत्रकार यांच्या कुटुंबियांना धोका तरी सदर गुन्हेगार यांना त्वरित अटक करून पत्रकारांच्या कुटूंबीयास न्याय द्यावा यासाठी सोनई ता नेवासा

येथे सुदर्शन मुंढे पोलीस उपअधीक्षक ,पोलीस  निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना निवेदन देण्यात आले यावेळी पत्रकार राहुल राजळे दैनिक दिव्य मराठी,

ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश येळवंडे  ,पत्रकार दादा दरंदले रोख ठोक न्युज अनगर,अविनाश जाधव दैनिक पुढारी,

अनिल रोडे दैनिक पुढारी आदी उपस्थित होते.सदर निवेदनाच्या प्रति  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,पोलीस अधीक्षक मनोज पाटील अनगर यांना पाठवण्यात आल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe