दुचाकीची सामोरा समोर धडक; एक जण जागीच ठार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- दोन दुचाकींची झालेल्या समोरासमोर भीषण धडकेत एकजण जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर-कोपरगाव रस्त्याने संगमनेरकडून तळेगाव दिघे गावाच्या दिशेने दिलीप निवृत्ती दिघे हे दुचाकीवरून प्रवास करीत होते.

दरम्यान बबन सीताराम दिघे हे संगमनेरच्या दिशेने दुचाकीवरून चालले होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास तळेगाव दिघे शिवारातील जुन्या खडी क्रशरनजीक दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होत अपघात झाला.

या अपघातात जबर मार लागल्याने बबन सीताराम दिघे हे जागीच ठार झाले, तर दिलीप निवृत्ती दिघे हे गंभीर जखमी झाले.

जखमी दिलीप दिघे यांना तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी भास्कर सीताराम दिघे यांनी फिर्याद दिली.

त्यानुसार अपघातास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून दिलीप निवृत्ती दिघे यांच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe