अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- काँग्रेसने वारंवार मागणी, पाठपुरावा करूनही मनपाने अजूनही ऑक्सीजन जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी काहीच हालचाल न केल्यामुळे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सिजन मास्क लावून काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या दालना बाहेर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये मनपा आयुक्तांना ऑक्सीजन बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत निर्देश देऊन देखील अजूनही कोणतीच पाऊले उचललेली नाहीत.
मनपा अजून किती नगरकरांचे जीव गेल्यावर जागी होणार आहे ? असा सवाल करण्यात आला. काँग्रेसने वारंवार मनपाकडे पाठपुरावा केला आहे. यासाठी दोन वेळा आयुक्त यांच्या समवेत तसेच एकदा आयुक्त, महापौर, उपायुक्त, आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत काँग्रेसची संयुक्त बैठक पार पडली होती.
यात विषय मार्गी लावण्यासाठी तातडीने बजेट तयार करत कृती केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मनपाने ४८ तासातच घूमजाव केले असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
दुसऱ्या लाटेतच मनपाच्या निष्क्रियतेमुळे शहरात अशी भयावह स्थिती आहे. तर तिसऱ्या लाटेत काय निभाव लागणार असा संतप्त सवाल किरण काळेंनी उपस्थित केला आहे. यावर आता मनपाने स्वतःच जम्बो सेंटर तातडीने उभे करणे अत्यंत गरजेचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|