अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा सुळसुळाट झाला आहे. यातच जिल्ह्यात रुग्णांची तपासणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. यातच एका अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अज्ञात व्यक्तीने कोरोना तपासणी केलेल्या किटची विल्हेवाट न लावता ते सामान प्रवरा नदी काठावर फेकुन दिल्याचा प्रकार घडला आहे.

दरम्यान अशा अज्ञात समाज कंटकाच्या कृत्यामुळे इतरांच्या जिवीतास धोका होवु शकतो, त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी आशी मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रवरा नदी पात्रालगत मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणीत वापर केलेले किट, सलाईन हातमोजे रँपीड टेस्ट करीता वापरण्यात येणारे साहित्य, मास्क सिरींज आदि वापरलेले साहित्य उघड्यावर फेकुन दिल्याचे आढळून आले.
याबाबतची माहिती प्रा.अशोक बडधे यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन खात्री केली. त्यांनतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.देविदास चोखर यांच्याशी संपर्क साधला, व त्यांना माहिती दिली.
डॉ.चोखर व त्यांच्या टिमने सदर ठिकाणी भेट देत पाहणी केली, त्यात रॅपिड टेस्ट करीता वापरलेले साहित्य फेकून दिल्याचे आढळून आले. कुणीतरी खाजगी लॅबधारकाचे हे कृत्य असावे,
अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. हे साहित्य या ठिकाणी टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करणार असल्याचेही डॉ.चोखर यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|