अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. यातच जिल्ह्यात लसीचा सातत्याने तुटवडा जाणवतो आहे.
यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनविषयी रोष निर्माण झाला आहे. यातच जिल्ह्यात गुरुवारी लसीकरणाचा फज्जा उडाला आहे. लसीकरण दरम्यान जिल्ह्यातील कोपरगावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

कोपरगावात लस घेण्यासाठी आलेल्या लोकांनी डॉक्टर व नर्सला धक्काबुकी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
त्यांनतर आम्हाला सुरक्षा मिळाली पाहिजे तरच लसीकरण सुरु ठेवणार असल्याचा पवित्रा आरोग्य सेवकांनी घेतला आहे.
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आज 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना प्रथम लस देण्यात येणार होती. याचदरम्यान 45 वर्षांच्या वरील नागरिकांनीही दुसरा डोस घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली.
केवळ 300 जणांना आज लस देण्यात येणार असल्याने नागरिकांनी पहाटे पासूनच मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंग नियम पायदळी तुडवण्यात आले.
ही गर्दी नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांनाही धक्काबुक्की झाल्याचे माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सचिन जोशी यांनी दिली आहे. अखेर गर्दी नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांची मदत रुग्णालय प्रशासनाला घ्यावी लागली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|