अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे विरुध्द हनीट्रॅप मालिकेबद्दल स्वतंत्र गुन्हा दाखल करा असे निवेदन ॲड. सुरेश लगड यांनी अहमदनगर जिल्ह्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केला आहे .
आपल्या या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि अहमदनगर येथील बहुचर्चीत रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे यास आपण अत्यंत गनिमी काव्याने अपार मेहनत घेऊन अटक करुन वेळोवेळी त्यास पोलीस कोठडी घेऊन तपास करीत आहात.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/02/Bal-Bothe-3.jpg)
आपल्या तपासात त्याने गुन्हयाचे कामी वापरलेला आयफोन हस्तगत केलेला आहे व त्याचा अहवाल फॉरेन्सीक लॅब येथुन येणे क्रमप्राप्त आहे.त्या संदर्भात तो अहवाल फॉरेन्सीक लॅब कडुन आला किंवा नाही याबाबत चौकशी व्हावी.
तसेच तो आयफोन उघडल्यानंतर त्यामध्ये बाळ बोठे यांचे अनेक गैरकृत्य समोर येतील.सदर रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे हा एका अग्रगण्य दैनिकाचा अहमदनगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक म्हणुन काम करत असतांना
त्याने ” हनी ट्रॅप ” नावाची मालीका अनेक भागामध्ये चालु करुन संपुर्ण नगरकरांचे लक्ष वेधुन घेतले ही नेमकी हनी ट्रॅपची मालीका कशा संदर्भात बोठेनी चालु केली होती व ही मालीका चालु करण्या मागे त्याचा काय हेतु होता तसेच
सदरची मालीका चालु करण्या मागे कोणाला ब्लॅकमेलींग करण्याचा उद्येश होता किंवा काय व ही मालीका कोणाचे संदर्भात प्रसिध्द केली याचेही खोलवर चौकशी आपल्या यंत्रणेकडुन जर केली तर निश्चितच त्यामध्ये बोठेचा प्रथमदर्शनी सहभाग दिसणार आहे अशी आमची खात्री आहे.
एवढेच नव्हे तर रेखा जरे हत्याकांड हे हनी ट्रॅपचे मालीकेनंतर घडलेले आहे आणि या हनी ट्रॅपच्या मालीके संदर्भात आपल्या अधिपत्याखालील कोतवाली पोलीस स्टेशन यांनी सन २०२० मध्ये बाळ बोठे याला पत्र पाठवुन खुलासा मागितलेला होता तर त्या संदर्भातही बोठे यांनी काय खुलासा केला होता कि नाही याबाबतची चौकशी होणे आवश्यक आहे.
ही मालीका बाळ बोठे कार्यकारी संपादक या नात्याने प्रसिध्द करीत असतांना त्यास नक्की माहित असणार की या मालीकेमध्ये कोण कोण आहेत व कशा संदर्भात ती मालीका प्रसिध्द केलेली होती .बाळ बोठे याने हनी ट्रॅपची मालीका प्रसिध्द केली तर मग त्या संदर्भात त्याने स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन संबधीता विराध्द फिर्याद का देऊ शकला नाही ,
त्यास कोणी अडवले होते का ? अशा परिस्थितीत रेखा जरे हत्याकाडातील मास्टर माईंड याचे विरुद्ध सविस्तर चौकशी करुन त्याचे विरुद्ध स्वतंत्र हनी ट्रॅप मालीका प्रसिध्द केल्याबद्यल गुन्हा दाखल करावा .बाळ बोठे यास अटक करुन बरेच दिवस होत आलेले आहेत .
दरम्यान त्याचे विरुद्ध ९० दिवसात चार्जसिट दाखल झाल्यास व त्यात तपास अपुर्ण राहिल्यास त्याचा फायदा हा आरोपी बोठेला होऊ शकतो .
तेंव्हा आपण स्वतःहा डोळयात तेल घालुन रेखा जरे हत्याकांडातील मुख्यसुत्रधार बाळ बोठे विरुध्द त्याने हनी ट्रॅप मालीका प्रसिध्द करुन संपुर्ण नगरकरांच्या भावना दुखावल्या म्हणुन स्वतंत्र गुन्हा दाखल करावा ही आमची विनंती आहे.सदरची विनंती ही मी आम जतनेचे वतीने जनहितार्थ करीत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|