अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या देखील वाढवल्या आहेत. मात्र कोरोनाच्या चाचण्या करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या अकोले तालुक्यात दिसून येत आहे.
जिल्ह्यातील तालुकास्तरावर कोरोना चाचणी केली कि कोरोनाबाधितांचे स्त्राव सायंकाळी नगरला पोहाेचतात. तेथे नंबरनुसार चाचणी होते आणि तिसऱ्या दिवशी उशिरा अहवाल अकोलेत येतो.
रुग्णपर्यंत अहवाल पोहोचण्यास चौथा दिवस उजाडतो. तोपर्यंत बाधित रुग्ण गावात, बाजारपेठेत फिरत राहतो. रुग्णवाढीचे हे एक प्रमुख कारण असून आरटीपीसीआर चाचणी यंत्रणा तालुका स्तरावर उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे.
चाचणीसाठी स्त्राव घेतल्यानंतर संबंधिताच्या हातावर शिक्का मारायचा व त्यास जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात ठेवायचे, असा प्रस्ताव आला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू दिसत नाही.
कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीच्या चाचण्या वाढवल्यास संसर्ग कमी होईल आणि वेळत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|