अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- केडगाव मधील पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा जय भगवान महासंघाच्या वतीने निषेध व्यक्त करुन,
या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून, कठोर कारवाई करण्याची मागणी जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी केली आहे.
मुरलीधर तांबडे एका दैनिकाचे उपसंपादक असून, त्यांच्या कुटुंबियांना मारहाण झाली आहे. केडगाव येथे राहत्या घरी असताना काही किरकोळ कारणावरून सदर भागातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पत्रकार तांबडे व त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला.
कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर, पत्रकार, आरोग्य कर्मचारी व समाजसेवक स्वत:चे जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे.
त्यांच्यावर दडपशाही करुन हल्ले करणे हे कायदा सुव्यवस्थेचा भंग आहे. सामाजिक योगदान देणार्या व्यक्तींच्या पाठीमागे जय भगवान महासंघ उभा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तर पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करणार्या सर्व गुंडांना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष लहामगे यांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|