कोरोनामूळे कर्ता व्यक्ती गमावणाऱ्या कुटूंबांना मिळणार युवानचा आधार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-  कोरोनाची सर्वाधिक झळ कर्ता व्यक्ती गमावणाऱ्या गरीब कुटुंबास बसत आहे. लॉकडाऊनमूळे त्यात अधिकच भर पडली आहे.

आधीच दुःखाचा डोंगर आणि लहान मुले असतील तर त्यांना काय खाऊ घालायचे, घर खर्च, भाडे किमान लॉकडाऊन संपेपर्यंत कसा भागवायचा ?

हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. ही गरज ओळखून नगरच्या ‘युवान’ संस्थेमार्फत गिव्ह इंडियाच्या सहयोगातुन अशा वंचित आणि गरजू कुटुंबांना तातडीचा म्हणून आधार देण्यात येणार आहे.

त्यासाठी कोरोनामूळे कर्ता व्यक्ती गमावणाऱ्या गरजू कुटुंबांनी युवान प्रतिनिधींशी ९०११११८७८७ किंवा ९८३४०८७९९६ या क्रमांकावर आवश्यक कागदपत्रांसह १५ मे २०२१ पूर्वी संपर्क साधावा.

गरजू, वंचित कुटुंबांच्या माहितीची ‘युवान स्वयंसेवकांमार्फत’ योग्य ती खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे सधन कुटुंबांची माहिती पाठवू नये, असे आवाहन युवानच्या वतीने करण्यात आले आहे

कोरोनामुळे आई-वडील दोन्ही गमावणाऱ्या मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही युवान पुढील काळात लोकसहभागातून स्वीकारणार आहे.

परंतू हा भार पेलवण्यासाठी समाजातील दानशूरांनीही पुढे येणे गरजेचे आहे. सामान्य नागरिकही ‘स्वयंसेवक’ म्हणून युवान सहवेदना उपक्रमात सहभागी होऊ शकतात.

तसेच वंचित कुटुंबांना मदतीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आणि युवानला योग्य माहिती पाठवण्यासाठी मदत करू शकतात.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|