सरसकट पीक विमा मिळण्यासाठी प्रयत्नशील: आ.तनपुरे

Ahmednagarlive24
Published:
अहमदनगर: योग्य पद्धतीने नियोजन करून मुळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी नगर पाथर्डी तालुक्यांसाठी योजनेमार्फत पुरवले जाईल. शेतकऱ्­यांच्या जनतेच्या हिताच्या प्रश्­नासाठी कायम कटिबद्ध असून, या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्­यांना झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून सरसकट पिक विमा मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याची भावना राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.
नगर तालुक्यातील खोसपुरी येथे आमदार तनपुरे यांनी शेतकऱ्­यांच्या बांधावर जावून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी तनपुरे यांच्या ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन खोसपुरी येथील तंटामुक्तीचे मा.अध्यक्ष हरिभाऊ हारेर, युवक कार्यकर्ते जाकीर शेख, गणेश भिसे, उपसरपंच अल्ताफ बेग, अनिल भिसे, अस्लम बेग, संदीप भिसे यांनी केले होते. याप्रसंगी ग्रामस्थांनी शेतीचे व पिण्याचे पाणी, सिंगल फेज वीज जोडणी, वाड्या वस्त्यांसाठी रस्ते आदी प्रश्­नांवर आमदारांचे लक्ष वेधले.
खोसपूरी, पांगरमल, मजले चिंचोली, सोकेवाडी, उदरमल ही पाच गावे मिळून ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी किमान एक तरी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली. खोसपुरी अंतर्गत पांढरीपुल येथील लहान मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय अंगणवाडी आणि मुख्यमंत्री पेजल योजनेमार्फत वाड्या वस्त्यांसाठी कायमस्वरूपी घरगुती पाणी पुरवठ्याचा मुद्द ग्रामस्थांनी उपस्थित केला.
तर परिसरातील शेतकऱ्­यांच्या जनावरांच्या आरोग्याबाबत शासकीय अधिकाऱ्­यांना सूचना करण्याचे सांगण्यात आले. आमदार तनपुरे यांनी संपुर्ण विकास आराखडा तयार करुन महत्त्वाची प्रश्­न तातडीने तर इतर प्रश्­न टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे आश्­वासन ग्रामस्थांना दिले.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment