पारनेर :- तालुक्यातील सुपे येथे वडिलांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करून रक्ताच्या नात्याला काळिमा फासलीय. या घटनेमधील पीडिता अल्पवयीन आहे. वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,सुप्यातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बापाने शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास स्वतःच्या मुलीस वासनेची शिकार बनवली. अत्याचारानंतर कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने मुलीस दिली.
घाबरलेल्या मुलीने सकाळी आईला या घृणास्पद प्रकाराची माहिती दिल्यानंतर आईने मुलीला नगरच्या चाईल्ड लाईन टीमकडे नेले. तेथे चौकशी करण्यात आल्यानंतर टीमच्या सदस्यांनी सुपे पोलिस ठाण्यात येउन नराधम बापाविरोधात सोमवारी रात्री फिर्याद दाखल केली.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी २८ सप्टेंबरलाही या नराधमाने स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मुलीची आई व बाप यांच्यात वारंवार भांडणे होत होती. या भांडणातूनच नराधमाने स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले.