अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- एक वाळूची वाहतूक करणारी ट्रक उपाधीक्षक मुंढे यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील वसंत फुलमाळी, संदीप चव्हाण ,कैलास पवार यांनी 7 एप्रिल रोजी पकडली होती.
ती ट्रक कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच पोलिसांनी मागीतली होती.
मात्र तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान हे तीनही कर्मचारी गुन्हा झालेल्या दिवसापासून फरार आहे.
यादरम्यान हे प्रकरण शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या भोवती फिरायला लागले होते. मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्या विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा तीन दिवसापूर्वी दाखल झाला होता.
या प्रकरणी उपाधीक्षक मुंडे यांची लाचलुचपत विभागाने कार्यालयात बोलावून चौकशी केले असल्याची माहिती उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी दिली.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित तिन्ही पोलिस कर्मचारी प्रसार झाले आहेत त्यांच्या अटकेनंतर तपासाला गती मिळेल असेही उपअधीक्षक खेडकर यांनी सांगितले.
या लाचखोर पोलीस कार्मचाऱ्यांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी प्रसार झाले आहेत त्यांचा शोध लाचलुचपत विभागाकडून सुरू आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|