हिंदुस्थानी भाऊला पोलिसांकडून अटक; जाणून घ्या अटकेचे कारण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-बिग बॉस’चा माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर ‘हिंदुस्थानी भाऊ’ (Hindustani Bhau) म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पापाराजी विराल भयानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आहे.

का झाली अटक ? :- जाणून घ्या कारण हिंदुस्तानी भाऊने १२वीच्या परिक्षांसोबतच इतर परिक्षाही रद्द कराव्यात अशी मागणी केली होती. त्यासाठी त्याने शिवाजी पार्क येथे आंदोलन करणार असल्याची माहिती शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे दिली होती.

आज आंदोलनासाठी शिवाजी पार्कात पोहोचण्यासाठी त्याने रुग्णवाहिकेचा वापर केला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी हिंदुस्तानी भाऊला ताब्यात घेतले आहे. पोलीस पोहोचण्यापूर्वी हिंदुस्तानी भाऊ शिवाजी पार्क येथे पोहोचला होता.

त्यावेळी त्याने तेथे उपस्थित असलेल्या मीडियासमोर १२वीच्या परिक्षा रद्द करण्याची मागणी केली. तितक्यात पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी हिंदुस्तानी भाऊला ताब्यात घेते. सोशल मीडियात आपण हिंदुस्थानी भाऊ याचे व्हिडिओ पाहिलेच असतील.

त्याने नुकत्याच आपल्या सोशल मीडियातील अकाउंटवर भडकाऊ पोस्ट केल्याने इंस्टाग्रामने त्यांचे खाते निलंबित केले होते. ज्यानंतर त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणे थांबले आहेत. काही काळानंतर त्यांचे फेसबुक अकाऊंटही निलंबित करण्यात आले होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe