काय सांगता… गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. यामुळे नागरिक देखील आपल्याला या संसर्गाची लागण होऊ नये यासाठी नवनवीन उपाय करत असतात.

यातच या संकटाचा फायदा घेऊन अनेकजण खोटे मेसेज तयार करून ते व्हायरल करत आहे. सोशल मीडियावर सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी भरपूर मेसेज व्हायरल होत आहेत.

यामध्ये गरम पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आलाय. तर कुठे घरात बसून पान खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना संबंधित अशा व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका.

कारण या सगळ्या अफवा आहेत, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गरम पाणी पिल्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही,

असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही,

असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्र सरकाच्या MyGovIndia या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

‘गरम पाणी प्यालाने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनापासून बचाव होत नाही. कुठल्याही ऐकवी माहितीवर विश्वास ठेवू नये’, असं केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe