जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांचे छापा सत्र सुरूच

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम असतानाही काही समाजकंटकांकडून जिल्ह्यात अवैध धंदे सुरूच ठेवण्यात आले आहे. या अवैध व्यवसायिंकांवर कारवाईसाठी पोलीस पथके नेहमीच तैनात असतात.

मात्र तरीही हे धंदे जोरात सुरूच आहे. नुकतेच राहुरी तालुक्यातील धामोरी फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून 35 लिटर गावठी दारू जप्त केली.

याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र गिर्हे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दुपारच्या सुमारास दुनगर

येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने तालुक्यातील धामोरी फाटा येथे एका दारूअड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. यावेळी 3 हजार 500 रुपये किंमतीची 35 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.

तसेच बेकायदेशीर दारूविक्री करणारा आरोपी राजेंद्र मच्छिंद्र गिर्हे, रा. धामोरी फाटा, ता. राहुरी याच्या विरोधात पोलीस हवालदार रोहीत येमुल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe