अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- श्रीरामपूर नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब उर्फ सुभाष (आप्पा )विठ्ठलराव गांगड यांचे आज रोजी दुःखद निधन झाले.
आप्पा गांगड हे गेल्या वीस दिवसापासून नगर येथील साईदीप हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. उपचारा दरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
गांगड हे सत्ताधारी अधिक गटातील प्रमुख नगरसेवकांपैकी एक होते. साईदीप येथे उपचार घेत असताना माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील,
नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन गांगड यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. त्यांच्या अकाली निधनाने शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. गांगड यांच्या पश्चात दोन बंधू ,आई ,पत्नी व इतर असा मोठा परिवार आहे
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|