अहमदनगर जिल्ह्यातील ते खासदार झाले आक्रमक म्हणाले मी सरपंच नाही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- दिल्लीत असणारे लोकसभेचे अधिवेशन,विविध बैठका यासाठी वर्षातील जवळपास दोनशे दिवस जातात.राहिलेल्या दिवसात मतदार संघात माझे काम सुरू असते.

मी भेटलो नाही तरी काम सुरू आहे.गावचे सरपंच लोकांना रोज भेटू शकतात.पण मी सरपंच नव्हे तर खासदार आहे,असे सांगत खासदार भेटत नाही या आरोपाला खा.लोखंडेंनीं उत्तर दिले. शिर्डी येथे एका कार्यक्रमासाठी खा. लोखंडे आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

त्यावेळी ते बोलत होत.त्यांच्यावरील आरोपांबाबत खुलासा करताना ते म्हणाले,सर्वसामान्य जनतेने कुठलाही राजकीय वारसा नसताना मला तीन वेळा आमदार व दोन वेळा खासदार केले आहे. दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन, महत्त्वाच्या बैठका यामुळे विविध कामासाठी दोनशे दिवस खर्च होतात.

राहिलेल्या काळात मतदार संघात मी असतो. केंद्र सरकारचा विविध योजना व राज्य सरकारचे सहकार्य घेऊन विकास कामासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. माझी भेट होत नसली तरी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी माझे काम सुरूच आहे.

मी जर सरपंच असतो तर भेटू शकलो असतो,पण मला जनतेने खासदार केले आहे. कुठल्या प्रकारची कारखानदारी,सहकारी संस्था, बँका नसताना जनतेने मोठया मताधिक्क्याने मला निवडून दिले. हे मला कसे विसरता येईल. माझा जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा नेहमीच प्रयत्न असतो.

मात्र इतरांप्रमाणेप्रमाणे मला जास्त लोकांना भेटता येत नाही,हे मोठया मनाने त्यांनी कबुली केले. तसेच माझी जशी अडचण आहे तशी खा. डॉ. सुजय विखे यांचीही होते.तसेच मी मागील खासदार पेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते शेवटी म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe