अंध अपंग निराधार लोकांना मोफत जेवण वाटप

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-नगर – कोरोना महामारीमुळे आज संपूर्ण जग संकटात सापडलेला आहे. या संकटाचे लढण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहे. पण सर्वसामान्य नागरिकांना आज उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. यामध्ये अंध-अपंग निराधार लोकांवरतर उपासमारीची वेळ आलेली आहे.

हाताला काम नसल्यामुळे पोटाची खळगी भारावयची कशी असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. अशाच अंध-अपंग आणि निराधार लोकांसाठी लक्षेट्टी परिवार व पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या वतीने मोफत जेवणाचा उपक्रम सुरू करण्यात आला.

यामध्ये रोज सकाळी 11 वाजेदरम्यान 100 लोकांना मोफत जेवण पार्सल स्वरुपात देण्यात येते. या उपक्रमांविषयी बोलताना गणेश लक्षेट्टी म्हणाले की, माणुसकीचा धर्म म्हणून हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे, आजची परिस्थिती खूप बिकट झालेले आहे.

अशा परिस्थितीत अनेकांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळणे मुश्किल झाले आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदा-रोजगार बंद झाल्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. त्यात कोरोनामुळे घरातील कर्ता माणूस निधन पावल्यामुळे निर्माण झालेले संकट त्याहून मोठे.

असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे. अशांना एक छोटीशी मदत म्हणून हा उपक्रम राबवित आहोत. गोरगरीब, अंध, अपंग, निराधार, कोरोना झालेले रुग्ण त्यांचे नातेवाईक अशांना किमान एक वेळचे जेवण तरी मिळाले पाहिजे या हेतूने लक्षेट्टी परिवार आणि पद्मशाली सोशल फाउंडेशन च्या वतीने हा उपक्रम चालू करण्यात आला आहे.

सध्या मर्यादित स्वरुपात असलेल्या उपक्रमांस जसजसे सहकार्य मिळेल तसतसे याचे स्वरुप व्यापक करु, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सौ.शिवानी लक्षेट्टी, सौ.लता भागवत, श्रीमती वाघ, श्रीमती तावरे, श्रीमती धरम, श्रीमती क्षीरसागर, सौ. गोदावरी भवर, सौ कोमल सोनवणे,

सौ. आरती मारपेली, सौ. मीराताई रेपाळे, सौ.लक्ष्मी बूरा, सौ. स्वाती चीट्याल, सौ. मीना धरणकर आदी जेवण तयार करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. हा उपक्रम पद्मशाली सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते, एकदंत गणेश मंडळ, मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठान,

सूर्यमुखी गुरुदत्त युवा विकास प्रतिष्ठान, संघर्ष प्रतिष्ठान स्टेशन रोड, सिद्धिविनायक तरुण मंडळ यांच्यामार्फत जेवणाचे पार्सल गरजूंपर्यंत पोचवण्यात येत आहे. हा उपक्रम यशस्वीतेसाठी पद्मशाली सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश लक्षेट्टी,

अजयकुमार लयचेट्टी, शुभम सुंकी, श्रीनिवास बुरगुल, वरद लक्षेट्टी, विशाल द्यावणपेल्ली, अमोल गांजेंगी, दीपक गुंडू, संतोष मदनाल, श्रीकांत आडेप, आशिष रंगा, अमित गाली, श्रीपाद डोळसे आदी परिश्रम घेत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|