अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-सध्या अहमदनगर शहरात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असून जिल्ह्यातील सर्वात जास्त प्रादुर्भाव शहरातच झाला आहे,जिल्हाभरातील रुग्ण शहरात उपचार घेत असल्याने सर्वच सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून येणार्या काळात महानगरपालिका स्वतः च्या मालकीचा ऑक्सिजन प्लँट उभा करणार असल्याची माहिती नगरसेवक तथा मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरूडे यांनी दिली.

file photo
मनपा आरोग्य समितीने एमआयडीसी येथील ऑक्सिजन प्लँटची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी समितीचे सदस्य संजय ढोणे, सचिन शिंदे, सतीश शिंदे, निखिल वारे, किशोर वाकळे आदी उपस्थित होते.
शहराचे आ. संग्राम जगताप महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करोना परिस्थितीमध्ये उपाययोजना करण्याचे काम आरोग्य समितीकडून सुरू आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|