भेसळखोर दूध संकलन केंद्राच्या चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राहुरी तालुक्‍यातील चंडकापूर येथील जयभवानी दूधसंकलन केंद्रातील दूधभेसळ प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दूध केंद्र चालक राजेंद्र चांगदेव जरे (वय 31, रा. चंडकापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे व अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांच्या पथकाने 31 डिसेंबर 2020 रोजी चंडकापूर येथे जय भवानी दूधसंकलन केंद्रावर छापा घातला होता.

घटनास्थळावरुन भेसळयुक्त मुद्देमाल जप्त करत दूधसंकलन केंद्राचा परवाना निलंबित केला होता. अन्न व औषध प्रशासनाने छाप्यात जप्त केलेले रसायनांचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.

त्यात मानवी शरीराला अत्यंत घातक असलेल्या लिक्विड पॅराफिन या रसायनाची दुधात भेसळ असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ तपास करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe