अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने उपचारासाठी रुग्णांना वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहे. यामुळे जिल्हाभरात कोव्हीड सेंटर सुरु करण्यात आले आहे.
यातच आता आणखी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. करोनाबाधीत रुग्णांसाठी शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या मालकीच्या भक्तनिवासात 4 हजार 200 बेडचे जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्याची घोषणा खा. सदाशिव लोखंडे यांनी नुकतीच केली आहे. तसा राज्य शासनाला प्रस्ताव पाठवण्यातही आला.
कोव्हिडच्या तिसर्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्यानंतर शासनाने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी पावले उचलली असून त्या पार्श्वभूमीवर रविवारी खा. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी शहरात पत्रकार परिषद घेऊन शिर्डीत 4 हजार 200 बेडचे जम्बो कोव्हिड सेंटर
उभारण्यासाठी राज्य सरकारने पत्राद्वारे परवानगी दिली असल्याचे सांगितले. मात्र राज्य शासनाकडून साईबाबा संस्थानला प्राप्त झालेल्या पत्रात असे म्हटले आहे की मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने असे निर्देश देण्यात येत आहे
की श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांनी तदर्थ समितीच्या मान्यतेने व उच्च न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने तसेच अन्य आवश्यक त्या परवानग्या घेऊन नियमानुसार व कायदेशीररित्या संस्थानच्या स्तरावर करता येणार्या बाबी संस्थान स्तरावरून कराव्यात व ज्या बाबीकरिता शासन मान्यता आवश्यक आहे.
खा. लोखंडे यांनी केलेल्या 4 हजार 200 बेड आणी ऑक्सिजन जरी संस्थानने उपलब्ध करून दिले तरीही या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये जवळपास हजारोंच्या संख्येने डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारी यांची भरती करावी लागणार आहे. त्याअनुषंगाने तयारी केली आहे का? असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|