बळीराजावर ओढावले जलसंकट ; या धरणाच्या पाण्याने तळ गाठला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- राज्यासह जिल्ह्यात गेल्यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे हे अगदी तुडुंब भरून वाहिले होते.

मात्र आता पावसाळा काही महिने अजून लांबणीवर असतानाच जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जाणून घ्या धरणातील शिल्लक जलसाठा उजनी धरणात २.७० टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. धरणाची पाणी पातळी ४९१.१३५ मीटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा १.४४ टीएमसी इतका शिल्लक आहे.

तर उजनी धरणातुन सिना-माढा बोगदा २९६ क्युसेस, दहिगाव एलआयएस (फाटा) ८५ क्युसेस, उप कॅनल (फाटा) ६५० क्युसेस, व मुख्य कॅनलमधुन सोलापूरसाठी ३१५० क्युसेसने पाणी विसर्ग गेल्या अनेक दिवसापासुन सुरू आहे.

तर सध्या उजनीतुन एकूण ४ हजार १८१ क्युसेसने पाणी विसर्ग सोलापूर भागासाठी सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी एक ते दोन दिवसात खालावत जाण्याची शक्यता आहे.

इंदापूर व पूणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. उजनी धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकरी अवलंबून आहे. यामुळे आता बळीराजावर देखील जलसंकट ओढवले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe