बाहेरगावच्यांच्या अतिक्रमणामुळे गावातील जनता लसीकरणापासून वंचित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- कोरोनाची लस प्रत्येकाला मिळावी अशी अपेक्षा सर्वांची आहे. नागरिक कोरोनाला घाबरुन लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत.

यातच आता बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांनी आता लसीकरणाला येऊन पाथर्डीकरांना लसीकरणासाठी वंचित ठेऊन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे.

यामुळे पाथर्डीकर लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी सरकार आग्रही असून नागरिकही लस घेण्यासाठी घाई करीत आहे.

पाथर्डीत प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच आता उपकेंद्रावरही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लसीकरणासाठी आता ऑनलाईन नोंदणी असल्याने नाशिक, नगर, पुणे, बीड येथील नागरिक पाथर्डीत लसीकरणासाठी दाखल होत आहेत.

शहरात आतापर्यंत पाच हजार 412 जणांनी कोरोनाचे लसीकरण केले असून 1436 जणांनी दुसरा डोसही दिला आहे. कोरोनावर लसीकरण हाच कोरोनाला रोखण्यासाठी रामबाण उपाय आहे,

याचे महत्व आता सर्वसामान्यांना समजल्याने ते लसीकरणासाठी गर्दी करू लागलेले आहेत. कोरोनाच्या लसीकरणासाठी लोकांनी मोबाईलवर रजिस्टेशन करुन त्यांचा ज्या दिवशी नंबर असेल त्याच वेळी यावे. विनाकारण गर्दी करु नये. असे आव्हान प्रशासनाने केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe