अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे दरदिवशी बाधितांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
यातच लसीकरणाबरोबरच तपासण्या देखील वाढवणे गरजेचे वाटू लागले आहे . यातच आता जिल्हयासाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक संभाव्य रुग्णांच्या चाचण्या करून संसर्ग आटोक्यात आणण्याच्या दिशेने यंत्रणा आता गतिमान झाली आहे.
नुकतेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय सर्व यंत्रणांना आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यासाठी आणखी 50 हजार रॅपीट अँटिजेन टेस्ट कीट्स प्राप्त झाले असून चाचण्यांची गती आता वाढणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.
याशिवाय, जिल्ह्यातील बाधित रुग्णांना आता होम आयसोलेशन बंद करून करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठीच्या दिशेने पावले पुढे टाकली जात आहेत.
दररोज प्राथमिक आरोग्य केंद्रावर किमान 50 आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये किमान 150 आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाव्यात.
बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून सर्व संभाव्य रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करावी, लसीकरण मोहिमेवेळी गर्दी होणार नाही यासाठी लसीकरण केंद्रावर पुरेसे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|