शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-करोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत शासनाने पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत. परंतु 23 मे रोजी इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक संघटनांनी तसेच पालकांनीही परीक्षा घेऊ नये किंवा पुढे ढकलावी याबाबत मागणी केली होती. त्यांनतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलल्याने जिल्ह्यातील 47 हजार विद्यार्थ्यांना ऐन करोना संकटात दिलासा मिळाला आहे.

दरम्यान शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातून 2 हजार 19 शाळांच्या 47 हजार 76 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यात 30 हजार 115 पाचवीचे विद्यार्थी, तर 16 हजार 961 आठवीचे विद्यार्थी आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वतीने या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी केंद्र निश्चितीचे काम पूर्ण झाले होते. जिल्ह्यात 368 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती.

दरम्यान सोमवारी परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तूर्तास तरी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. .

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe