भुकेल्या माणसांसह जनावरांची काळजी शहरातील मुक्या जनावरांसाठी अडीच टन चारा वाटप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- सध्या कोरोना महामारी व टाळेबंदीचा सर्वसामान्यांच्या जीवनावर दुष्परिणाम दिसून येत असून, मुके जनावरे देखील चार्‍या अभावी व्याकुळ आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून अविरतपणे सर्वसामान्य गरजू घटकांना दोन वेळचे जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेने भूकेने व्याकुळ झालेल्या मुक्या जनावरांसाठी अडीच टन चारा उपलब्ध करुन आधार दिला.

शहरातील मुक्या जनावरांसाठी घास वाटपाचा उपक्रम आमदार संग्राम जगताप व शहराचे विभागीय पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

शेतातून टेम्पो भरुन आणलेले अडीच टन घास पांजरपोळ, पांजरपोळ कायनेटीक कंपनी, अरणगाव, अरुणोदय गो शाळा, शकुंतला गो शाळा इसळक, गवळीवाडा पत्रकार चौक, सुयश गोशाळा कल्याण रोड यांच्यासह शहरातील मुक्या जनावरांना वाटप करण्यात आले.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनाच्या लढ्यात सर्वसामान्यांसाठी घर घर लंगर सेवा आधार ठरले आहे. टाळेबंदीत भूकेलेल्यांसह गरजू घटकांना दोन वेळचे जेवण पुरविण्यासह मुक्या जनावरांच्या चार्‍याची देखील सोय करण्यात आली आहे.

गरजू, मनुष्य व प्राण्यांसाठी लंगर सेवेने केलेली मदत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांनी घर घर लंगर सेवेत पोलीस प्रशासन देखील सहभागी असल्याचे अभिमान वाटत आहे. या सेवेने गरजूंसह मुक्या प्राण्यांना देखील आधार मिळाला आहे.

या संकटकाळात प्रत्येकाने आपली जबाबदारी उचळण्याची गरज असून, प्रशासनाला देखील सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. हरजितसिंह वधवा यांनी पहिल्या टाळेबंदीप्रमाणे दुसर्‍या टाळेबंदीतही मुक्या जनावरांचा प्रश्‍न अधिक गंभीर झाला आहे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने हिरवा चारा मिळणे देखील अवघड झाले होते. शहरातील मुके जनावरे भूकेने व्याकुळ झाली असताना त्यांना घास उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमासाठी लंगर सेवेचे हरजीतसिंग वधवा,

जनक आहूजा, राहुल बजाज, प्रीतीपालसिंग धुप्पड, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, कैलास नवलानी, राहुल बजाज, राजा नारंग, सतिश गंभीर, राजेंद्र कंत्रोड, सनी वधवा, आदित्य छाजेड, कबीर धुप्पड, टोनी कुकरेजा, राजेश कुकरेजा, मन्नू कुकरेजा, सुरेश कुकरेजा,

काली लालवानी, सिमर वधवा, नारायण अरोरा, गोविंद खुराणा, जय रंगलानी, राहुल शर्मा, शरद बेरड, राजवंश धुप्पड, अजय पंजाबी, प्रमोद पांतम, पुरुषोत्तम बेती, संदेश रपारिया, सुनील मुळे, विपुल शाह यांनी परिश्रम घेतले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe